Build & Design
Build & Design
Build & Design
Build & Design
Build & Design
Build & Design
Build & Design
Build & Design
Build & Design
previous arrowprevious arrow
next arrownext arrow

"प्रतिभेची ओळख, आत्मविश्वासाची जडणघडण आणि स्वप्नांच्या पूर्तीचा विश्वास."

आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह हा महाराष्ट्रातील विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात सामाजिक भान आणि मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी ओळखला जाणारा अग्रगण्य समूह आहे. सन १९३३ पासून शिक्षण व समाज उन्नती च्या ध्येयाने कार्यरत असलेल्या या समूहात दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लीग, शेवगाव (१९५३), नव महाराष्ट्र शिक्षण मंडळ, शेवगाव (१९६९) आणि राष्ट्रीय शिक्षण मंडळ, अहमदनगर (१९५३) या संस्था कार्यरत असून समूहाच्या एकूण ५२ शैक्षणिक शाखा समाजसेवेत योगदान देत आहेत. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या सामाजिक आंदोलनांच्या प्रेरणेवर उभा असलेला हा समूह शिक्षणाद्वारे वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य सातत्याने करीत आला आहे. प्रारंभी दहा विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला प्रवास वसतिगृहे, शाळा, बालगृहे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक झाला. स्वातंत्र्य सेनानी डॉ. भाई सथ्था आणि कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या अथक परिश्रमातून या संस्थांनी गरीब, शेतकरी, कामगार, आणि समाजातील मागास घटकांच्या मुलांना शिक्षण, निवास आणि संस्काराची आधारभूत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गावोगावी शाळा व महाविद्यालये सुरू करणे, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे चालवणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे ही या समूहाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. सन १९८८ पासून ॲड. डॉ. विद्याधर (शिवाजीराव) काकडे यांच्या नेतृत्वाखाली या समूहाने गुणात्मक आणि उपक्रमशील विकासाची नवी उंची गाठली आहे. “शिक्षणाद्वारे समाज परिवर्तन” हे ध्येय गाठण्यासाठी समर्पण भावनेतून हा समूह कार्य करीत आहे.
Build & Design
Build & Design
Build & Design
Build & Design
Build & Design
Build & Design
Build & Design
Build & Design
Build & Design
previous arrowprevious arrow
next arrownext arrow

"प्रतिभेची ओळख, आत्मविश्वासाची जडणघडण आणि स्वप्नांच्या पूर्तीचा विश्वास."

आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह हा महाराष्ट्रातील विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात सामाजिक भान आणि मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी ओळखला जाणारा अग्रगण्य समूह आहे. सन १९३३ पासून शिक्षण व समाज उन्नती च्या ध्येयाने कार्यरत असलेल्या या समूहात दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लीग, शेवगाव (१९५३), नव महाराष्ट्र शिक्षण मंडळ, शेवगाव (१९६९) आणि राष्ट्रीय शिक्षण मंडळ, अहमदनगर (१९५३) या संस्था कार्यरत असून समूहाच्या एकूण ५२ शैक्षणिक शाखा समाजसेवेत योगदान देत आहेत. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या सामाजिक आंदोलनांच्या प्रेरणेवर उभा असलेला हा समूह शिक्षणाद्वारे वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य सातत्याने करीत आला आहे. प्रारंभी दहा विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला प्रवास वसतिगृहे, शाळा, बालगृहे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक झाला. स्वातंत्र्य सेनानी डॉ. भाई सथ्था आणि कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या अथक परिश्रमातून या संस्थांनी गरीब, शेतकरी, कामगार, आणि समाजातील मागास घटकांच्या मुलांना शिक्षण, निवास आणि संस्काराची आधारभूत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गावोगावी शाळा व महाविद्यालये सुरू करणे, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे चालवणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे ही या समूहाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. सन १९८८ पासून अॅड. डॉ. विद्याधर (शिवाजीराव) काकडे यांच्या नेतृत्वाखाली या समूहाने गुणात्मक आणि उपक्रमशील विकासाची नवी उंची गाठली आहे. “शिक्षणाद्वारे समाज परिवर्तन” हे ध्येय गाठण्यासाठी समर्पण भावनेतून हा समूह कार्य करीत आहे.

संस्कारै वर्धते राष्ट्रम् |

दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लीग

१९३३

छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनातून आणि गांधी-आंबेडकर समझोत्याच्या प्रेरणेतून १९३३ साली ‘दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लीग’ या संस्थेच्या कार्य सुरुवात झाली. शिक्षणच समाजउद्धाराचे प्रभावी साधन आहे या विश्वासातून अहिल्यानगर येथील माळीवाडा येथे दहा विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली शाळा पुढे जनतेच्या शैक्षणिक आशेचे केंद्र बनली. शिक्षणाबरोबरच गरीबांसाठी मोफत वैद्यकीय सेवेची परंपरा संस्थेने सुरू केली. स्वातंत्र्य चळवळीला बळ देणारे छात्रालय हे शाहू–फुले–आंबेडकर विचारांचे केंद्र ठरले.

कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी या कार्याला नवी उभारी दिली. शेवगाव–पाथर्डी परिसरात वसतिगृहे, शाळा आणि महाविद्यालये उभारून हजारो गरीब, शेतकरी, मजूरांच्या मुलांना शिक्षणाची संधी दिली. “वसतिगृह तिथे शाळा” हे तत्त्व त्यांनी जपले.

आज ॲड. डॉ. विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली संस्था १ प्राथमिक शाळा, ७ माध्यमिक शाळा, ५ कनिष्ठ महाविद्यालये, १ सीबीएसई स्कुल, १ वरिष्ठ महाविद्यालय, ११ वसतिगृहे व विविध उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण, मूल्याधिष्ठित शिक्षण देत समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नेत आहे.

नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ

१९६९

२९ जुलै १९६९ रोजी स्थापन झालेल्या नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ, शेवगाव या संस्थेने अहिल्यानगर जिल्ह्याच्या ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा दिली आहे. कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून उभारलेली ही संस्था ग्रामीण मुलांना शिक्षणाद्वारे सक्षम बनवण्याच्या ध्येयाने कार्यरत आहे. आज संस्थेमार्फत २ प्राथमिक व १ माध्यमिक आश्रमशाळा, १ आर्ट्स-सायन्स महाविद्यालय, १ डी.एल.एड. व १ बी.एड. कॉलेज, १ डी.फार्मसी व १ बी.फार्मसी कॉलेज व ३ वसतिगृहे चालविले जातात.

आश्रमशाळांमधून शेतकरी, मजूर, ऊसतोड कामगार व वंचित घटकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण व कौशल्यवृद्धीचे शिक्षण दिले जात आहे. महाविद्यालयांमधून उच्च शिक्षणाची उन्नत दृष्टी घडवली जाते, तर शिक्षणशास्त्र महाविद्यालये गुणवत्तापूर्ण शिक्षक निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. फार्मसी कॉलेजच्या वतीने औषधनिर्माण शास्त्रातील अद्ययावत ज्ञान व कौशल्य देऊन देशासाठी कुशल फार्मासिस्ट घडवत आहे.

वसतिगृहामुळे अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्वप्ने साकार झाली आहेत. मूल्याधिष्ठित शिक्षण, सामाजिक उत्तरदायित्व आणि सर्वांगीण विकास यांचा महामेरू म्हणून नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ ग्रामीण शिक्षणाच्या प्रगतीचा भक्कम पाया बनले आहे.

राष्ट्रीय शिक्षण मंडळ, अहमदनगर

१९५३

राष्ट्रीय शिक्षण मंडळ, अहमदनगर ही संस्था स्वातंत्र्य चळवळीच्या प्रेरणेतून जन्मलेली शिक्षणसेवेची तेजस्वी परंपरा आहे. लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य, स्वदेशी व राष्ट्रीय शिक्षणाच्या चतु:सूत्रीच्या प्रभावाने १९२० साली घासगल्ली भागात राष्ट्रीय पाठशाळेची स्थापना झाली. भाई सथ्या, रामभाऊ हिरे, बाबुराव चौकर आदींच्या त्यागातून उभारलेल्या या शाळेने युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वाभिमान व स्वावलंबन निर्माण केले. महात्मा गांधींनी स्वतः भेट देऊन या शाळेचे कौतुक केले आहे.

विणकाम, सुतारकाम, छपाई, हस्तव्यवसाय यांतून स्वावलंबी शिक्षण दिले गेले. १९२५ मध्ये सुरू झालेल्या ‘मोहन मुद्रा मंदिर’ छापखान्याद्वारे राष्ट्रीय विचारांचा प्रसार वाढला. शाळेतील विद्यार्थी सत्याग्रहात सक्रिय सहभागी झाल्याने १९३२ मध्ये इंग्रजांनी शाळा बंद केली. परंतु संस्थेने हार न मानता १९३३ मध्ये छात्रालय सुरु करून आपले कार्य पुढे सुरू ठेवले.

स्वातंत्र्यानंतर १९५३ साली संस्थेची महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये नोंदणी करण्यात आली. आज राष्ट्रीय शिक्षण मंडळ गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रतीक ठरले असून फार्मसी कॉलेज, हायस्कूल, प्राथमिक शाळा व तांत्रिक शिक्षणाद्वारे समाजासाठी सक्षम पिढी घडवत आहे.

कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह

प्राथमिक विद्यालये / Primary Schools

(०२)

माध्यमिक विद्यालये / Secondary Schools

(09)

कनिष्ठ महाविद्यालये / Junior Colleges

(07)

आश्रमशाळा / Ashram Schools

(03)

विभागीय कार्यालये / Administrative Offices

(02)

संगणक विभाग / Computer Departments

(07)

वरिष्ठ महाविद्यालये / Senior Colleges

(04)

फार्मसी महाविद्यालये / Pharmacy Colleges

(04)

सी.बी.एस.ई. स्कूल / CBSE School

(01)

वसतिगृहे / Hostels

(14)

समूहात ४३५ कर्मचारी कार्यरत असून १०,७५२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच १,३१,५६४ माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.

“कौशल्य, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी”

आमची शैक्षणिक दिशा

व्हिजन

सर्जनशीलता, चिकित्सक विचार, सौंदर्यदृष्टी, सामाजिक बांधिलकी, स्वयंरोजगार कौशल्य, पर्यावरण जागरूकता, सांस्कृतिक मूल्ये आणि क्रीडाभावना या गुणांचा शैक्षणिक प्रक्रियेच्या माध्यमातून प्रसार करून जबाबदार नागरिक घडविणे तसेच सशक्त व प्रगतशील भारत बनवणे.

मिशन

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शैक्षणिक प्रक्रियेत सर्जनशीलता, विश्लेषणात्मक विचार, सौंदर्याची जाण, सामाजिक जाणीव, उद्योजकतेचे कौशल्य, पर्यावरण संवेदनशीलता, सांस्कृतिक वारशाची जपणूक व शारीरिक स्वास्थ्य यांचा समावेश करून आदर्श नागरिक घडविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

“शिक्षण मनाला दिशा देतं, भविष्य घडवतं, समाज समृद्ध करतं आणि आजीवन शिकण्याची प्रेरणा देतं.”

कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहात, प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये मोठी स्वप्नं जागवून ती पूर्ण करण्याची ताकद निर्माण करणारे वातावरण आम्ही उभे केले आहे. आमचे संस्थापक आबासाहेब काकडे यांची ठाम भूमिका होती की— शिक्षण हीच व्यक्तिमत्त्व बदलणारी आणि समाज घडवणारी सर्वोत्तम शक्ती आहे.या विश्वासाने प्रेरित होत आम्ही उत्कृष्ट शिक्षणपद्धती, आधुनिक सुविधा आणि अनुभवी शिक्षकवर्ग यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना सक्षम, आत्मविश्वासू आणि मूल्याधारित बनवण्यास कटिबद्ध आहोत.

आम्ही फक्त पुस्तकी शिक्षण देत नाही; तर क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, विज्ञान-तंत्रज्ञान, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकास या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांना संधी देतो.

आमच्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी योग्य मार्गदर्शन, उत्तम संधी आणि दृढ मूल्यांसह समाजात एक जबाबदार, यशस्वी आणि आत्मविश्वासू नागरिक म्हणून घडतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

Adv. Dr. Vidyadhar Kakade

M.A. , L.L.B.-Gold Medalist Pune University , D.Litt

Our Value

" संस्कारैः वर्धते राष्ट्रम् "

- Values Enrich the Nation

There are many variations of passages of is but the majority have suffered alteration in some form, by injected humou or randomised words even slightly believable

  • At our college, we believe that संस्कार (values) are the true strength of any nation.

  • We teach students to respect their parents, teachers, traditions, and the motherland.

  • Good values like honesty, kindness, and discipline help students become responsible citizens.

  • When students carry these संस्कार in their hearts, they contribute to building a strong, united, and prosperous nation.

  • We inspire every student to live with values and make our country proud.

We are Abasaheb Kakade Educational Group, a trusted institution committed to excellence in education since 1933, shaping futures through knowledge, innovation, and values, while fostering social responsibility and community development.

"प्रतिभेची ओळख, आत्मविश्वासाची जडणघडण आणि स्वप्नांच्या पूर्तीचा विश्वास."

आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह हा महाराष्ट्रातील विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात सामाजिक भान आणि मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी ओळखला जाणारा अग्रगण्य समूह आहे. सन १९३३ पासून शिक्षण व समाज उन्नती च्या ध्येयाने कार्यरत असलेल्या या समूहात दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लीग, शेवगाव (१९५३), नव महाराष्ट्र शिक्षण मंडळ, शेवगाव (१९६९) आणि राष्ट्रीय शिक्षण मंडळ, अहमदनगर (१९५३) या संस्था कार्यरत असून समूहाच्या एकूण ५२ शैक्षणिक शाखा समाजसेवेत योगदान देत आहेत. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या सामाजिक आंदोलनांच्या प्रेरणेवर उभा असलेला हा समूह शिक्षणाद्वारे वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य सातत्याने करीत आला आहे. प्रारंभी दहा विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला प्रवास वसतिगृहे, शाळा, बालगृहे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक झाला. स्वातंत्र्य सेनानी डॉ. भाई सथ्था आणि कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या अथक परिश्रमातून या संस्थांनी गरीब, शेतकरी, कामगार, आणि समाजातील मागास घटकांच्या मुलांना शिक्षण, निवास आणि संस्काराची आधारभूत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गावोगावी शाळा व महाविद्यालये सुरू करणे, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे चालवणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे ही या समूहाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. सन १९८८ पासून अॅड. डॉ. विद्याधर (शिवाजीराव) काकडे यांच्या नेतृत्वाखाली या समूहाने गुणात्मक आणि उपक्रमशील विकासाची नवी उंची गाठली आहे. “शिक्षणाद्वारे समाज परिवर्तन” हे ध्येय गाठण्यासाठी समर्पण भावनेतून हा समूह कार्य करीत आहे.

“Innovating Knowledge, Empowering Tomorrow”

We encourage research, innovation, and creativity, equipping students with skills to solve real-world challenges and lead with excellence.

Vibrancy @ AKSS

Inspires limitless growth, offering diverse education and dynamic extracurricular activities that empower students to excel beyond academics and discover their true potential.”

Sport

We encourage physical fitness, teamwork, and discipline through diverse sports activities, ensuring students develop leadership, resilience, and a healthy competitive spirit.

Traditional Festivals

Our institute celebrates traditional festivals with cultural enthusiasm, fostering unity, respect for heritage, and joyful participation that connects students with values, traditions, and shared community bonding.

Workshops

Regular workshops enhance student skills with practical knowledge, interactive sessions, and expert guidance, preparing them for academic excellence, career growth, and personal development.

Industrial Visit

We organize industrial visits to bridge theory with practice, providing real-world exposure, professional insights, and practical learning experiences that inspire innovation and career readiness.

IBT Creation Skill Development

Through IBT Skill Creation, we empower students with hands-on training, technical expertise, and entrepreneurial skills, building confidence and competence for future career opportunities.

Social Work in COVID

Our students actively engage in social work, promoting empathy, responsibility, and community service, contributing meaningfully to society while shaping themselves as responsible citizens

Upcoming Events

Be part of events that shape your skills and future.

Experience learning beyond classrooms through exciting college events and activities