Achievements
दलित मित्र’ सन्मान
समाजातील वंचित घटकासाठी कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे संस्थेस 'दलित मित्र' हा मानाचा पुरस्कार बहाल केला गेला. हा पुरस्कार संस्थेचे तत्कालीन विश्वस्त नौशेरवान नौरोजची सथ्था यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, सन २०२२-२३ सालचा “शाहू–फुले–आंबेडकर पुरस्कार” हा बहुमान दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लीग, शेवगाव या संस्थेला प्रदान करण्यात आला.वंचित, दुर्बल आणि मागास घटकांच्या उन्नतीसाठी संस्था सातत्याने करीत असलेले कार्य, शिक्षणाचा प्रसार, सामाजिक समतेसाठीचे प्रयत्न आणि निष्ठा या सर्वांची राज्यस्तरावर नोंद घेण्यात आली.

सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल संस्थेच्या विश्वस्त सौ. हर्षदाताई काकडे यांना २०११-१२ सालचा राज्यस्तरीय 'राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार' व 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्कार' देण्यात आला. दि. २१/१२/२०१२

सौ. हर्षदाताई काकडे यांनी आबासाहेब काकडे शिक्षण समूहातील महिला शक्ती संघ या संस्थेच्या वतीने व अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून महिला व बालकांसाठी उल्लेखनीय कार्य केले. बालविकास, शिक्षण, आरोग्य, जलसिंचन, महिलांचे स्वावलंबन व सबलीकरण आणि सामाजिक कल्याण इत्यादी क्षेत्रांत त्यांनी राबवलेल्या उपक्रमांमुळे अनेकांचे जीवन सकारात्मकपणे बदलले. त्यांच्या सेवाभावी वृत्ती, नेतृत्वगुण आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून तत्कालीन मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. - ९ मार्च २०२३

ॲड. डॉ. विद्याधर (शिवाजीराव) काकडे यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल सेंट्रल अमेरिका विद्यापीठातर्फे मानद डी.लिट्. पदवी प्रदान करण्यात आली. शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, समाजाच्या उन्नतीमध्ये दिलेले योगदान आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशंसा करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उभारणे, समाजातील विविध घटकांमध्ये प्रबोधन घडवणे आणि गुणवत्तााधारित शिक्षणाचा प्रसार ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये ठरली. समाजहित आणि शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेऊन प्रदान करण्यात आलेली ही मानद पदवी त्यांच्या आयुष्यभराच्या योगदानाचा प्रतिष्ठेचा गौरव आहे.

Additional Achievements
Participation of group’s students in international-level sports.
Students from the group have secured Class I and II government positions.

Group alumni now working in medical and engineering fields hold respected positions in society.
