

















FDL
NMSM
RSM
छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनातून आणि गांधी-आंबेडकर समझोत्याच्या प्रेरणेतून १९३३ साली ‘दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लीग’ या संस्थेच्या कार्य सुरुवात झाली. शिक्षणच समाजउद्धाराचे प्रभावी साधन आहे या विश्वासातून अहिल्यानगर येथील माळीवाडा येथे दहा विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली शाळा पुढे जनतेच्या शैक्षणिक आशेचे केंद्र बनली. शिक्षणाबरोबरच गरीबांसाठी मोफत वैद्यकीय सेवेची परंपरा संस्थेने सुरू केली. स्वातंत्र्य चळवळीला बळ देणारे छात्रालय हे शाहू–फुले–आंबेडकर विचारांचे केंद्र ठरले.
कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी या कार्याला नवी उभारी दिली. शेवगाव–पाथर्डी परिसरात वसतिगृहे, शाळा आणि महाविद्यालये उभारून हजारो गरीब, शेतकरी, मजूरांच्या मुलांना शिक्षणाची संधी दिली. “वसतिगृह तिथे शाळा” हे तत्त्व त्यांनी जपले.
आज ॲड. डॉ. विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली संस्था १ प्राथमिक शाळा, ७ माध्यमिक शाळा, ५ कनिष्ठ महाविद्यालये, १ सीबीएसई स्कुल, १ वरिष्ठ महाविद्यालय, ११ वसतिगृहे व विविध उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण, मूल्याधिष्ठित शिक्षण देत समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नेत आहे.
२९ जुलै १९६९ रोजी स्थापन झालेल्या नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ, शेवगाव या संस्थेने अहिल्यानगर जिल्ह्याच्या ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा दिली आहे. कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून उभारलेली ही संस्था ग्रामीण मुलांना शिक्षणाद्वारे सक्षम बनवण्याच्या ध्येयाने कार्यरत आहे. आज संस्थेमार्फत २ प्राथमिक व १ माध्यमिक आश्रमशाळा, १ आर्ट्स-सायन्स महाविद्यालय, १ डी.एल.एड. व १ बी.एड. कॉलेज, १ डी.फार्मसी व १ बी.फार्मसी कॉलेज व ३ वसतिगृहे चालविले जातात.
आश्रमशाळांमधून शेतकरी, मजूर, ऊसतोड कामगार व वंचित घटकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण व कौशल्यवृद्धीचे शिक्षण दिले जात आहे. महाविद्यालयांमधून उच्च शिक्षणाची उन्नत दृष्टी घडवली जाते, तर शिक्षणशास्त्र महाविद्यालये गुणवत्तापूर्ण शिक्षक निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. फार्मसी कॉलेजच्या वतीने औषधनिर्माण शास्त्रातील अद्ययावत ज्ञान व कौशल्य देऊन देशासाठी कुशल फार्मासिस्ट घडवत आहे.
वसतिगृहामुळे अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्वप्ने साकार झाली आहेत. मूल्याधिष्ठित शिक्षण, सामाजिक उत्तरदायित्व आणि सर्वांगीण विकास यांचा महामेरू म्हणून नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ ग्रामीण शिक्षणाच्या प्रगतीचा भक्कम पाया बनले आहे.
राष्ट्रीय शिक्षण मंडळ, अहमदनगर ही संस्था स्वातंत्र्य चळवळीच्या प्रेरणेतून जन्मलेली शिक्षणसेवेची तेजस्वी परंपरा आहे. लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य, स्वदेशी व राष्ट्रीय शिक्षणाच्या चतु:सूत्रीच्या प्रभावाने १९२० साली घासगल्ली भागात राष्ट्रीय पाठशाळेची स्थापना झाली. भाई सथ्या, रामभाऊ हिरे, बाबुराव चौकर आदींच्या त्यागातून उभारलेल्या या शाळेने युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वाभिमान व स्वावलंबन निर्माण केले. महात्मा गांधींनी स्वतः भेट देऊन या शाळेचे कौतुक केले आहे.
विणकाम, सुतारकाम, छपाई, हस्तव्यवसाय यांतून स्वावलंबी शिक्षण दिले गेले. १९२५ मध्ये सुरू झालेल्या ‘मोहन मुद्रा मंदिर’ छापखान्याद्वारे राष्ट्रीय विचारांचा प्रसार वाढला. शाळेतील विद्यार्थी सत्याग्रहात सक्रिय सहभागी झाल्याने १९३२ मध्ये इंग्रजांनी शाळा बंद केली. परंतु संस्थेने हार न मानता १९३३ मध्ये छात्रालय सुरु करून आपले कार्य पुढे सुरू ठेवले.
स्वातंत्र्यानंतर १९५३ साली संस्थेची महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये नोंदणी करण्यात आली. आज राष्ट्रीय शिक्षण मंडळ गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रतीक ठरले असून फार्मसी कॉलेज, हायस्कूल, प्राथमिक शाळा व तांत्रिक शिक्षणाद्वारे समाजासाठी सक्षम पिढी घडवत आहे.
(०२)
(09)
(07)
(03)
(02)
(07)
(04)
(04)
(01)
(14)
समूहात ४३५ कर्मचारी कार्यरत असून १०,७५२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच १,३१,५६४ माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.
सर्जनशीलता, चिकित्सक विचार, सौंदर्यदृष्टी, सामाजिक बांधिलकी, स्वयंरोजगार कौशल्य, पर्यावरण जागरूकता, सांस्कृतिक मूल्ये आणि क्रीडाभावना या गुणांचा शैक्षणिक प्रक्रियेच्या माध्यमातून प्रसार करून जबाबदार नागरिक घडविणे तसेच सशक्त व प्रगतशील भारत बनवणे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शैक्षणिक प्रक्रियेत सर्जनशीलता, विश्लेषणात्मक विचार, सौंदर्याची जाण, सामाजिक जाणीव, उद्योजकतेचे कौशल्य, पर्यावरण संवेदनशीलता, सांस्कृतिक वारशाची जपणूक व शारीरिक स्वास्थ्य यांचा समावेश करून आदर्श नागरिक घडविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहात, प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये मोठी स्वप्नं जागवून ती पूर्ण करण्याची ताकद निर्माण करणारे वातावरण आम्ही उभे केले आहे. आमचे संस्थापक आबासाहेब काकडे यांची ठाम भूमिका होती की— शिक्षण हीच व्यक्तिमत्त्व बदलणारी आणि समाज घडवणारी सर्वोत्तम शक्ती आहे.या विश्वासाने प्रेरित होत आम्ही उत्कृष्ट शिक्षणपद्धती, आधुनिक सुविधा आणि अनुभवी शिक्षकवर्ग यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना सक्षम, आत्मविश्वासू आणि मूल्याधारित बनवण्यास कटिबद्ध आहोत.
आम्ही फक्त पुस्तकी शिक्षण देत नाही; तर क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, विज्ञान-तंत्रज्ञान, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकास या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांना संधी देतो.
आमच्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी योग्य मार्गदर्शन, उत्तम संधी आणि दृढ मूल्यांसह समाजात एक जबाबदार, यशस्वी आणि आत्मविश्वासू नागरिक म्हणून घडतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

M.A. , L.L.B.-Gold Medalist Pune University , D.Litt
कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह ठामपणे मानतो की संस्कार ही राष्ट्राची खरी ओळख आणि शक्ती आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आई-वडिलांप्रती आदर, गुरुजनांप्रती कृतज्ञता, परंपरांप्रती जिव्हाळा आणि मातृभूमीप्रती अभिमान रुजवणे—हे आमचे प्रमुख ध्येय आहे. प्रामाणिकपणा, करुणा, शिस्त, जबाबदारी आणि सहकार्य यांसारखी मूल्ये विद्यार्थ्यांना केवळ सुशिक्षित बनवत नाहीत, तर त्यांना सजग, संवेदनशील आणि राष्ट्रनिष्ठ नागरिक म्हणून घडवतात.
संस्कारांची ही बीजे जेव्हा विद्यार्थ्यांच्या स्वभावात रुजतात, तेव्हा ते विचारांनी समर्थ, कृतीने प्रामाणिक आणि समाजासाठी उपयुक्त व्यक्ती म्हणून पुढे येतात.
हीच मूल्ये पुढे जाऊन एकसंध, प्रगतीशील आणि उज्ज्वल राष्ट्रनिर्मितीचे भक्कम पाय बनतात.
प्रत्येक विद्यार्थ्याने मूल्याधिष्ठित जीवन’ जगावे, आपल्या वर्तनातून देशाचा गौरव वाढवावा आणि राष्ट्राला अभिमान वाटावा असे कार्य करावे—हीच आमची प्रेरणा आणि त्यासाठी वाटचाल आहे.
We encourage research, innovation, and creativity, equipping students with skills to solve real-world challenges and lead with excellence.
We encourage research, innovation, and creativity, equipping students with skills to solve real-world challenges and lead with excellence.
We encourage research, innovation, and creativity, equipping students with skills to solve real-world challenges and lead with excellence.
We encourage research, innovation, and creativity, equipping students with skills to solve real-world challenges and lead with excellence.
We encourage research, innovation, and creativity, equipping students with skills to solve real-world challenges and lead with excellence.
We encourage research, innovation, and creativity, equipping students with skills to solve real-world challenges and lead with excellence.
उच्च शिक्षणानुभूती, विविध शिक्षणक्रम आणि गतिशील उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासातच नव्हे तर आयुष्यातही उत्कृष्टता गाठण्यासाठी सक्षम बनविणे आणि त्यांना खऱ्या क्षमतेचा शोध घेण्यास प्रेरीत करणे.
आमच्या संस्थेत क्रीडेला शिक्षणाइतकेच महत्त्व दिले जाते. विविध क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, टीमवर्क, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित केले जातात. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संयम, सहनशीलता, स्पर्धात्मकता आणि आरोग्यदायी वृत्ती बळकट होते. सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आम्ही विद्यार्थ्यांना विविध क्रीडा संधी निर्माण करून देत उच्च गुणवत्तेच्या शिक्षकांकरवी मार्गदर्शन उपलब्ध करून देतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आत्मविश्वास व सक्षमता देतो.
आमच्या संस्थेत पारंपरिक सण मोठ्या सांस्कृतिक उत्साहाने साजरे केले जातात. विविध सण-उत्सवांमधील सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकता, सांस्कृतिक वारशाबद्दल आदर आणि आनंदमय सहभागाची भावना निर्माण होते. परंपरा, मूल्ये आणि सामाजिक बंध दृढ करणारे हे सण विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवतात. सामूहिक सादरीकरणातून त्यांच्यात संवेदनशीलता, सहकार्य आणि समुदायभावना अधिक बळकट होत जाते.
आमच्या संस्थेत नियमितपणे आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला नवे परिमाण देतात. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संवादात्मक सत्रे आणि प्रत्यक्ष अनुभवाद्वारे विद्यार्थ्यांची कौशल्ये तर घडतातच, पण आत्मविश्वास आणि विचारशक्तीही उजळून निघते. अशा कार्यशाळांमुळे त्यांची शैक्षणिक प्रगती, करिअरची दिशा आणि व्यक्तिमत्त्व विकास अधिक सक्षम होतो. ज्ञान, अनुभव आणि नवकल्पनांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या कार्यशाळा विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया घालून देतात.
आमच्या संस्थेत विद्यार्थ्यांना सिद्धांत आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा सेतू बांधण्यासाठी नियमित औद्योगिक भेटी आयोजित केल्या जातात. उद्योग परिसरातील प्रत्यक्ष कार्यपद्धती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि वास्तवातील व्यावसायिक वातावरणाचा अनुभव विद्यार्थ्यांना नव्या दृष्टीकोनाची, व्यावहारिक ज्ञानाची आणि उद्योगजगताच्या उंबरठ्यावर उभे राहण्याची आत्मविश्वासपूर्ण तयारी करून देतो. अशा भेटींमुळे त्यांच्यात नवोन्मेषी विचार, करिअरकेंद्री दृष्टिकोन आणि व्यावसायिक प्रगल्भता विकसित होते, ज्यातून उज्ज्वल भविष्याचा मार्ग अधिक भक्कम बनतो.
IBT Skill Creation च्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण, तांत्रिक प्राविण्य आणि उद्योजकतेची कौशल्ये देऊन सक्षम बनवतो. प्रत्यक्ष कृतीतून शिकणे, नवनवीन तंत्रांचे ज्ञान आणि समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कौशल्यसंपन्नता आणि भविष्यातील करिअर संधींना सामोरे जाण्याची तयारी दृढ होते. भविष्याभिमुख, कौशल्याधारित आणि नवउद्योगांना प्रेरक अशा या प्रशिक्षणातून विद्यार्थी सशक्त, समर्थ आणि स्पर्धाक्षम बनतात.
कोविड महामारीच्या कठीण काळात आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाने मानवतेचे श्रेष्ठ उदाहरण घालत अमरापूर आणि चापडगाव येथे शाळेच्या इमारतींमध्ये मोफत कोविड केअर सेंटर चालविले. संस्थेतील सेवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत रुग्णांची निस्वार्थ सेवा केली. रुग्णांसाठी मोफत सकस अन्न, निवास व्यवस्था, अल्प दरात वैद्यकीय उपचार दिले. प्राणायाम व योगासना द्वारे मानसिक–शारीरिक बळ देण्याची जबाबदारी संस्थेने मनापासून निभावली. ज्या काळात भीतीपोटी अनेकांनी साथ सोडली होती, त्या वेळी संस्थेनेच या रुग्णांना आधार, काळजी आणि जिवंतपणाची आशा दिली. मानवी मूल्यांवर आधारित हा सेवाकार्याचा अनोखा आदर्श, संस्थेच्या करुणा, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीचे जिवंत प्रतीक ठरला.
आमच्या संस्थेत शिक्षण हे केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित नाही. विविध उपक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यशाळा आणि विशेष उपक्रमांद्वारे विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवातून शिकतात, वाढतात आणि स्वतःला सिद्ध करतात.
आगामी कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या क्षमतेला नवी उंची द्या, नवीन संधी शोधा आणि आपले जीवन अधिक समृद्ध करा!
Christmas
Makar Sankranti
Republic Day